तरुणांमध्ये छोट्या-मोठ्या कारणांवरून वाद होण्याच्या घटना नेहमी घडत असतात. दरम्यान उरुळी कांचन येथील पद्मश्री मनीभाई देसाई जुनियर कॉलेजमध्ये देखील अशीच घटना घडली आहे. येथे विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये चांगलीच हाणामारी झाली आहे. इंस्टाग्रामवर ठेवण्यात आलेल्या स्टेटसवरून (Instagram status) हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध हत्यारांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या गटाविरुद्घ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच ठाणे दौऱ्यावर; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण
पद्मश्री मनीभाई देसाई जुनियर कॉलेजमध्ये बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या (College students) दोन गटांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एकमेकांना खिजवणारे स्टेटस ठेवले होते. याबाबत या दोन्ही गटांना आक्षेप होते. कॉलेजच्या पार्किंग मध्ये एकमेकांना जाब विचारला असता, दोन्ही गटांमध्ये वादावादी झाली.
मोठी बातमी! अदानी समूह संकटात; व्यापार क्षेत्रात बसला मोठा धक्का
यानंतर हळूहळू वादाचे रूपांतर हाणामारी (Fighting) मध्ये झाले. हाणामारी करताना विद्यार्थ्यांनी रॉड, लोखंडी स्टिक, लाकडी दांडके यांचा वापर केला. यामुळे अनेकांना दुखापत झाली आहे. या पार्श्वभूमीवर 11 विद्यार्थ्यांवर लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; राज्यात लवकरच शिक्षक भरती होणार