Site icon e लोकहित | Marathi News

माणुसकी दाखवणे पडले महागात, अज्ञात व्यक्तीला दिली लिफ्ट आण तो निघाला चोर

Showing humanity was expensive, an unknown person was given a lift and he turned out to be a thief

नवी दिल्ली: आपण दररोज पाहतो की रस्त्यावरून जाताना कोणी व्यक्ती हात दाखवून लिफ्ट मागतोय. मग सावधान! त्या व्यक्तीला मदत (Help) करताना थोडा विचार करा. कारण ते अज्ञात लोक स्वतः संकटात असल्याचा बनाव करत काही वेळेला तुम्हाला संकटात (crisis) टाकू शकतील. अशीच एक घटना नवी दिल्ली (New Delhi) येथे घडली आहे. एका व्यक्तीने पायावर पट्टी बांधून दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. दरम्यान दुचाकीस्वाराने त्या व्यक्तीला गाडीवर बसवले. परंतु गाडी काही अंतरावर गेल्यानंतर पीडित व्यक्ती लिफ्ट देणाऱ्याला लुटून पसार झाला.

मोठी बातमी! थ्री इडियट्स फेम ‘या’ अभिनेत्याचे अचानक निधन

स्वतःजवळ लपवून ठेवलेला चाकू बाहेर काढत दुचाकीस्वाराच्या गळ्यावर टेकवला. त्याने दुचाकीस्वाराच्या खिशातील पैसे आणि मोबाईल चोरला आणि पसार झाला. ही खळबळजनक घटना नवी दिल्लीतील रोहिणी परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी बेगमपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आरोपी फरार असून घटनास्थळाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा शोध घेतला जात आहे. मोकम सिंह असे तक्रारदार दुचाकीस्वाराचे नाव असून तो पेशाने मेकॅनिक आहे.

Salman Khan: ‘या’ अल्पवयीन मुलाला दिली होती सलमान खानची सुपारी, दिल्ली पोलिसांनी केली अटक

पायाला जखम झालेय थोडे पुढे नेऊन सोडा म्हणाला अन्…

लुटारूने दुचाकीस्वारासमोर आपण जखमी असल्याचा बनाव केला. त्याने पायाला पट्टी बांधली होती. आणि पायाला खूप मोठी जखम झाली असून चालता येत नाही, मला पुढे नेऊन सोडा अशी विनवणी त्या लुटारुने दुचाकीस्वराला केली होती. दुचाकीस्वराला त्याची दया आली आणि त्याने गाडीवर बसवले. परंतु काही अंतरावरच लुटारूने जीवे मारण्याची धमकी दिली. गळ्यावर चाकू टेकवत तुला आत्ताच खाल्लास करेन असे धमकावले आणि पैसे व मोबाईल चोरून फरार झाला.

जगात सर्वाधिक पैशाची उलाढाल दूध व्यवसायामध्ये होते, कारण…

Spread the love
Exit mobile version