श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला (Aftab Poonawala) याने पुन्हा एकदा वकील बदलला आहे. आफताब पूनावाला याने न्यायालयात नियुक्त केलेल्या सरकारी वकिलाच्या जागी आता अक्षय भंडारी यांची वकील म्हणून नियुक्ती केली आहे. आफताबचे नवे वकील अक्षय भंडारी यांनी युक्तिवाद सुरू करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे.
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत पुन्हा एकदा मोठी चूक; तरुणाने थेट…
कोर्टाने आफताबला युक्तिवाद करण्याची शेवटची संधी दिली आहे. कोर्टाने आफताबला सांगितले की, जर आता वकील बदलला तर त्याला आपला युक्तिवाद मांडण्याची दुसरी संधी दिली जाणार नाही. कोर्टाने आफताबच्या नवीन वकिलाला खटल्याशी संबंधित सर्व कागदपत्रे देण्यास सांगितले आहे.
“लग्नाच्या मंडपात विधी चालु होते, अचानक माकडाने वधू-वराच्या डोक्यावर झेप घेतली अन्…”, पाहा Video
आता या प्रकरणी पुढील सुनावणी ३१ मार्च रोजी दुपारी २ वाजता दिल्लीतील साकेत न्यायालयात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ३१ मार्चला काय सुनावणी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राहुल गांधी प्रकरणात केतकी चितळेची उडी; शरद पवारांच्या ‘त्या’ प्रकरणाचा उल्लेख करत म्हणाली…