श्रेया बुगडेने ‘चला हवा येऊ द्या’साठी केलेली ‘ती’ इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला लोकं भरभरून प्रेम देतात. या कार्यक्रमाचे चाहते जगभर आहे तर. या कार्यक्रमात अनेक कलाकार लोक तसेच राजकीय व्यक्ती देखील येऊन गेल्या आहेत. आता कार्यक्रमातील प्रेक्षकांसाठी अभिनेत्री श्रेया बुगडेने चांगली बातमी शेअर केली आहे.

या कार्यक्रमाच्या महाराष्ट्रातचं नव्हे तर जगभरात सतत चर्चा होत असतात. या कार्यक्रमाद्वारे भाऊ कदम, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे हे कलाकार प्रसिद्धीझोतात आले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रेया बुगडे घराघरांत पोहचली आहे. नुकतीच तिने प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

श्रेया बुगडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे. तिने ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरील व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “तब्बल ८ वर्षांनी, नव्या वास्तूत आजपासून थुक्रटवाडी चा श्री गणेशा!!! तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या नेहेमीप्रमाणे”.

श्रेया बुगडेची ही इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. चाहते या पोस्टवर कमेंटचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *