Site icon e लोकहित | Marathi News

Shreyas Talpade । हार्ट अटॅक आल्यानंतर श्रेयस तळपदेच्या पत्नीची हात जोडून विनंती, म्हणाली, “माझ्या पतीच्या..”

Shreyas Talpade

Shreyas Talpade । श्रेयस तळपदे हे नाव आता मनोरंजन विश्वासाठी नवीन नाही. श्रेयसने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये (Shreyas Talpade Film) काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनावर वर्चस्व गाजवलं आहे. सध्या तो ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या (Shreyas Talpade Upcoming Film) शुटींगमध्ये व्यस्त आहे. गुरुवारी शुटींगनंतर घरी आल्यानंतर त्याला हार्ट अटॅक (Shreyas Talpade Heart Attack) आला. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची तब्येत ठीक आहे. (Latest Marathi News)

MS Dhoni Jersey । मोठी बातमी! सचिन पाठोपाठ धोनीची 7 नंबरची जर्सी कायमची निवृत्त करण्याचा BCCI चा निर्णय

सोशल मीडियावर पोस्ट करत श्रेयसची पत्नी तृप्ती तळपदेने (Trupti Talpade) आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये (Trupti Talpade Post) श्रेयसच्या प्रकृतीसंदर्भातील समस्येनंतर त्याच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करणाऱ्या तसेच त्याच्या तब्येतीबद्दल विचारपूस करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

“माझ्या पतीच्या आरोग्यासंदर्भातील घडामोडीनंतर ज्यांनी काळजी व्यक्त केली आणि त्याच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. मला सर्वांना हे सांगताना समाधान वाटत आहे की आता श्रेयसची प्रकृती चांगली असून त्याला काही दिवसांमध्ये रुग्णालयातून घरी सोडलं जाईल. (Shreyas Talpade Heart Attack Wife Comment)

Deepika Padukone । रणवीर सिंह नाही तर दीपिकाला ‘या’ अभिनेत्याच्या मुलाची व्हायचं होतं आई, अभिनेत्रीनेच केला मोठा खुलासा

दरम्यान, या पोस्टच्या शेवटी तृप्तीने आता सर्वांनी श्रेयस आणि त्यांच्या कुटुंबाची प्रायव्हसी जपावी अशी विनंती केली आहे. श्रेयसची रिकव्हरी सुरु असून आमच्या खासगीपणाचा तुम्ही सर्वजण आदर कराल अशी अपेक्षा आहे. तुमच्या पाठिंब्याचा आम्हाला दोघांनाही खूप आधार वाटत आहे,” असंही तृप्तीने म्हटलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांचे पोस्टने लक्ष वेधलं आहे.

Sharad Pawar । शरद पवारांना मोठा धक्का! बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Spread the love
Exit mobile version