Shrigonda Accident । सध्या श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातुन अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव परिसरात नगर-दौंड महामार्गावरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर टेम्पो आणि महिंद्रा झायलो या दोन चार चाकी गाड्यांचा भीषण अपघात (A terrible accident) झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण या ठिकाणी रहिवासी असलेले शेख कुटुंबीय बेलवंडी फाटा मार्गे नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोळगाव या ठिकाणी कोळगाव वाले बाबांच्या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी कारमधून येत होते. यावेळी सकाळी घारगाव परिसरात नगर-दौंड महामार्गावरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला आहे.
ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याची माहिती तेथील उपस्थित लोकांनी दिली आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.