Shrigonda News । श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण हे तालुक्यात मोठे असलेले गाव आहे. पूर्वी मांडवगण मधून प्रत्येक तासाला तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जायला एसटी असायची. पण गेल्या काही महिन्यांपासून श्रीगोंदा आगरातून येणाऱ्या गाड्यांची संख्या खूप कमी झाली आहे. त्यामुळं मांडवगण आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांची जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी जायला प्रचंड गैरसोय होत आहे.
Accident News । अतिशय भीषण अपघात! धुक्याचा अंदाज न आल्याने ट्रकने तरुणाला चिरडलं
कित्येक वेळा लोकांना दोन-तीन तास एसटीची वाट पहावी लागते तरी वेळेत एकही एसटी येत नाही. तरी आपण मांडवगण ला येणाऱ्या एसटी सुरळीत करण्यात याव्यात आणि मांडवगण येथे असलेले बस स्थानकाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे आसपास घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. प्रवाशांना बस स्थानकात थांबण्यासाठी जागा नाही तसेच हे बसस्थानाक एकदम पडलेल्या अवस्थेत आहे तरी राज्य परिवहन महामंडळ यांनी याचे त्वरित नूतनीकरण करून प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी दिला आहे.
Sharad Mohol News । शरद मोहोळ हत्या प्रकरणातील वकिलांनी न्यायालयात मांडली आपली बाजू