Shrikant Shinde । ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या याच टिकेल आता शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Ajit Pawar । “…अशा लोकांना ओवाळून टाकले पाहिजे”, अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य
याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “2014 मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha Constituency) शिवसेनेच्या तत्कालीन खासदाराने राजीनामा दिला होता. त्यावेळी शिवसेनेला उमेदवार देखील मिळत नव्हता. मात्र त्यावेळी आपल्या वडिलांनी (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) यांनी कोणताही विचार न करता मुलाला उमेदवार म्हणून घोषित केले. असे श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.
2014 मध्ये ज्यावेळी लोकसभेसाठी उमेदवार सापडत नव्हता. ज्यावेळी शिवसेनेचा खासदार पक्ष सोडून गेला तेव्हा कल्याण लोकसभेची जागा कशी निवडून येईल? असा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही विचार न करता मला उभं केलं आणि त्यावेळी खूप कठीण परिस्थितीत निवडणूक लढलो. आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत. त्यावेळी विचार केला नाही की आपल्या घरातला कुणीतरी उभं केलं पाहिजे किंवा प्रचाराला ताकद लावली पाहिजे. असा घणाघात श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.