
मुंबई : एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापण केलं. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये रोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद होताना दिसतोय. याच पार्श्वभूमवीर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक फोटो ट्वीट करण्यात आला आहे. आता या फोटोवरून एकनाथ शिंदेंवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत (Ravikant Varpe) वरपे यांनी ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. आणि सोबतच कॅप्शन मध्ये लिहिले की, ” खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय.हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर?” अशा शब्दांमध्ये रविकांत वरपे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं जोरदार टीका केली आहे.
Coriander: बापरे! कोथिंबीरीचे दर कडाडले! मिळतोय ‘इतका’ भाव
रविकांत वरपे म्हणाले, “बहुतेक मुख्यमंत्री गणपती मंडळ, नवरात्र उत्सव, पितृपक्ष यांसारख्या इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी इतर लोकांची काम पाहण्याची जबाबदारी सुपर सीएम म्हणून श्रीकांत शिंदेंकडे दिली आहे, असं आम्हाला वाटतं”. नेमका राज्याचा कारभार कोण पाहतंय? हे राज्य अधांतरी आहे असंच वाटतंय. ज्याला जे वाटतंय, तो ते करतोय”, असे देखील ते म्हणाले आहेत.
“ मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा सन्मान बाकी लोकांसोबत त्यांच्या कुटुंबीयांनी सुद्धा ठेवावी लागते . तुम्हाला काही शासकीय भेटीगाठी किंवा अनौपचारिक भेटी घ्यायच्या असतील, तर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या बाजूला बसून घ्या. ती महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या स्वाभिमानाची खुर्ची आहे”, असं देखील रविकांत वरपे म्हणाले. “मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात कमी आणि गणपती मंडळांना जास्त भेटी देत आहेत. अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली आहे.
Pakistan: पाकिस्तान कर्णधार बाबर आझमचा रिझवानसोबत विश्वविक्रम, विराट कोहलीला टाकले मागे