Shubman Gill । भारतीय संघाचा दमदार खेळाडू शुबमन गिल सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. कधी तो क्रिकेटमुळे तर कधी तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. मागच्या काही दिवसापासून शुबमन गिल याचं नाव सारा तेंडुलकर हिच्यासोबत जोडण्यात येत आहे. त्यामुळे देखील तो चर्चेत आहे दरम्यान. सध्या देखील शुबमन चर्चेत आला आहे. मात्र यावेळी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) किंवा क्रिकेटमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे तो चर्चेत आला आहे. (Shubman Gill Viral Photo)
शुबमन गिलचे (Shubman Gill ) काही फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये शुबमन २२ वर्षीय अभिनेत्री आणि दिग्दर्शकासोबत दिसत आहे. अभिनेत्री आणि दिग्दर्शकासोबत फोटो व्हायरल होत असल्यामुळे क्रिकेटर म्युझिक व्हिडिओमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये शुबमन गिल अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) हिच्यासोबत आणि इतर सेलिब्रिटीं सोबत दिसत आहेत. माहितीनुसार, शुबमन गिल याला पंजाबी गाण्यांची जास्त आवड आहे. म्हणून शुबमन नव्या म्युझिक व्हिडिओ मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा देखील आता सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मात्र याबद्दल अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
instantbollywood या instagram पेजवरून यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असून नेटकरी या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट करत आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की, शुभमच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे? त्याला बॉलीवूड मध्ये जायचं नाही ना? तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तुझ्यासाठी क्रिकेट बेस्ट आहे’ अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट या पोस्टवर येत आहेत.