
Sikandar Shaikh । पुणे जिल्ह्यामध्ये फुलगाव या ठिकाणी सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम निकाल समोर आला आहे. गत विजेता शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांच्यामध्ये अंतिम लढत झाली. या लढतीमध्ये सिकंदर शेखने शिवराज राक्षेला आसमान दाखवत 66 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा किताब पटकावला आहे. त्यामुळे सगळीकडे सिकंदर शेखची चर्चा होताना दिसत आहे. (Latest Marathi News)
Ajit Pawar । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शरद पवार गटातील आमदार अजित पवार गटात जाणार
माती विभागामधून संदीप मोटेचा पराभव करून सिकंदर शेख अंतिम फेरी दाखल झाला होता. त्याचबरोबर गादी विभागामधून हर्षद कोकाटेचा पराभव करत शिवराज राक्षे (Shivraj demons) देखील दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दाखल झाला. यानंतर सिकंदर शेख आणि शिवराज राक्षेमध्ये लढत झाली. या रोमहर्षक लढतीत सिकंदर शेख ने शिवराज राक्षेला आसमान दाखवत महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा किताब पटकवला आहे.
अवघ्यात 23 सेकंदाच्या लढतीत सिकंदरने बाजी मारली आहे. गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सिकंदरला पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र यंदा त्यांने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावत आपणच कुस्तीचा किंग असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे सगळीकडे सिकंदर शेख चे कौतुक होताना दिसत आहे.
Viral Video । कार पार्किंगमध्ये सहा तरुणींची तुफान हाणामारी; व्हिडीओ पाहून व्हाल थक्क