Sikkim Rain News । सिक्कीमध्ये निसर्गाचा मोठा कहर पाहायला मिळाला आहे. सिक्कीममधील ल्होनाक तलावावर अचानक ढग फुटल्याने तीस्ता नदीला पूर आला. यामध्ये लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. प्रशासनाने आसपासच्या लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. शोध मोहीम सुरू आहे. (Sikkim Heavy Rain)
लष्कराची वाहनेही बुडाली
पहाटे 23 सैनिक बेपत्ता झाल्याची बातमी आली होती. त्यानंतर आता 23 जवानांसह एकूण 30 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. गुवाहाटीतील संरक्षण पीआरओने सकाळी सांगितले होते की, ‘सिक्कीमच्या उत्तरेकडील ल्होनाक तलावाला अचानक पूर आला. 23 जवान बेपत्ता आहेत. चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने डाउनस्ट्रीमच्या पाण्याची पातळी अचानक 15-20 फुटांपर्यंत वाढली. त्यामुळे सिंगतामजवळील बारडांग येथे उभ्या असलेल्या लष्कराच्या वाहनांची कोंडी झाली. लष्कराचे २३ जवान बेपत्ता तर ४१ वाहने चिखलात बुडाल्याचे वृत्त आहे.
भाजप नेते उग्येन त्सेरिंग ग्यात्सो भुतिया म्हणाले, “सरकारी यंत्रणा कामाला लावून लोकांचे प्राण वाचवले जात आहेत, ज्याचा अहवाल येणे बाकी आहे. यात कोणतीही जीवित वा मालमत्तेची हानी झालेली नाही, परंतु सिंगताममध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. काही लोक बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
Pune News । मोठी बातमी! पुण्यात तरुणीवर कोयत्याने हल्ला केलेल्या आरोपीला ३ महिन्यानंतर जामीन मंजूर