
भारतीय संविधान हे भारताच्या व्यवस्थेचे मूळ आहे. प्रत्येक भारतीयासाठी हक्क व कर्तव्ये ( Rights & Responsibilitis) यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यकारभार संविधानावर चालू लागला होता. या दिवशी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली होती. यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ (Republic Day) म्हणून साजरा केला जातो. संविधानाच्या अंमलबजावणी नंतर भारतात खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात झाली होती.
एकनाथ शिंदेंच्या सातारा दौऱ्यावरील संकट टळले; राजू शेट्टींनी घेतली नमती भूमिका
परंतु, असे असले तरी याआधीच 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते. हा दिवस ‘संविधान दिन’ (Constitution Day) म्हणून साजरा केला जातो.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय ‘संविधानाचे शिल्पकार’ समजले जाते. संविधानाचा व संविधान तयार करण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Aambedkar) यांचा सन्मान व्हावा यासाठी हा दिवस खास ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
शरद पवारांना मोठा धक्का! ‘या’ जवळच्या नेत्याने सोडला पक्ष
संविधानातील मूल्यांचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने सामाजिक न्याय मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी ’26 नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून जाहीर केला. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो. इतकंच नाही तर भारतातील शाळा महाविद्यालयांमध्ये आजच्या दिवशी संविधानाची प्रस्तावना शिकवली जाते. तसेच संविधानाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर गौतमी पाटीलवर भडकल्या; म्हणाल्या,”….याला लावणी म्हणत नाहीत.”