Sinhagad Fort । सिंहगडावर जाण्याच्या विचार करताय तर थांबा; त्या ठिकाणी दिसली धक्कादायक गोष्ट

Sinhagad fort news

Sinhagad Fort । पावसाचे दिवस असल्याने अनेकजण फिऱ्यांसाठी सिंहगडावर जात आहेत. अनेक पर्यटक सिंहगडावर (Sinhagad) गर्दी करत आहेत. लहान मुले, मोठी माणसे त्याचबरोबर तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सिंहगडावर फिरताना दिसत आहे. मात्र आता सिंहगडावर फिरायला जाताना खूप विचार करावा लागणार आहे. कारण की सिंहगडावर एक धक्कादायक गोष्ट दिसली आहे.

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! अजित पवार आमदारांसह पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, चर्चांना उधाण

ही धक्कादायक गोष्ट दुसरी तिसरी कोणती नसून सिंहगडाच्या घेऱ्यात बिबट्या आणि बछड्याचे दर्शन झाले आहे. यामुळे तेथील परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता सिंहगड किल्ल्याच्या परिसरामध्ये असलेल्या गावांमध्ये याबाबत नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. (Sinhagad Fort)

महिन्याला 60 हजार पगार, घरही मोफत! तरीही या कारणामुळे अनेकजण करत नाहीत ‘ही’ नोकरी

या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर पर्यटकांनी फिरायला जाताना विचार करून जावे असे आव्हान देखील करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकरी संकटात असताना काही टोळ्यांची हप्तेखोरी सुरु, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांचा घेराव

Spread the love