Crime News । अमरावती : रागाच्या भरात कोण काय करेल? याचा काही भरोसा नाही. अलीकडच्या काळात गुन्ह्यात (Crime) वाढ झाली आहे. प्रशासनाला देखील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालता येत नाही. यामुळे कित्येकांचे संसार उध्वस्त होत आहेत. अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रागाच्या भरात एका व्यक्तीने तिघाजणांना चिरडले आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना अमरावतीमध्ये (Amravati Crime) नाचोना गावात घडली आहे. मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान आपल्या अंगणात गप्पा मारत बसलेल्या कुटुंबाला एका व्यक्तीने कारने चिरडले आहे. शेजारच्या घरातील कोंबडी कुत्र्याने खाल्ल्याच्या रागातून कृत्य केल्याचे समोर आले आहे. यात तीन जण जागीच ठार झाले असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. (Six Persons Crushed By Four Wheeler)
Accident News । दुर्दैवी! ऊस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने चिमुकल्याला चिरडलं
मृत व्यक्तींना तातडीने दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. आरोपी आणि पीडित शेजारी राहतात. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस उपअधीक्षक विक्रम साळी यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे नाचोना गावात तसेच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
Ajit Pawar । अखेर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले…