लहान मुलांच्या अदांवर आपण कायम फिदा होत असतो. लहान मुलांमध्ये असामान्य बुद्धिमत्ता असते. ते सगळ्या गोष्टी फार लवकर शिकून घेत असतात. फार कौतुकाने आपण या सगळया गोष्टी पाहत असतो. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतील. यामध्ये एक व्हिडिओ सध्या फार ट्रेंड ( trending Video) होतोय. यामध्ये एक लहान मुलगी फार सुंदर पद्धतीने भजन म्हणत असून तिचे बोबडे बोल प्रेक्षकांची मने जिंकत आहेत.
शेतकऱ्यांसाठी बेलवंडी फाटा येथे भाजीपाला संकलन केंद्र सुरु
या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी भगवान हनुमानाच्या सत्संग कार्यक्रमात भजन म्हणताना दिसत आहे. यामध्ये तिने शाळेचा गणवेश घातला असून ती फार गोड दिसत आहे. (Girl Singing Hanuman Bhajan) सत्संग कार्यक्रमातील इतर लोकांसोबत बसून ही मुलगी भजन म्हणत वादन देखील करत आहे. लहान असून देखील तिथे उपस्थित असणाऱ्या भक्तांचे भजन म्हणताना ती नेतृत्त्व करताना पहायला मिळत आहे.
पश्मिना रोशनसोबतच्या अफेअर बद्दल कार्तिक आर्यनने सोडले मौन; म्हणाला, “एखाद्या मुलीसोबत….”
Cutest Bhajan ❤️😍 pic.twitter.com/zVTh6G0TJ4
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) November 22, 2022
या व्हिडिओमधील सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या लहान मुलीला भजन देखील व्यवस्थित आठवत आहे. कुठेही न चुकता ती हे भजन म्हणत आहे. तसेच भजन गात असताना एक म्हाताऱ्या आजी या मुलीला बक्षीस म्हणून काही पैसे देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, ती मुलगी अत्यंत निरागसपणे ते पैसे घेण्यास नकार देते. लहान मुलांची निरागसता ( Cute guesture) वेड लावणारी असते. याचे दर्शन या व्हिडिओमधून होत आहे.
Ajit Pawar: अजित पवारांनी बारामतीचा रेडा घेऊन गुवाहाटीला जावं – अब्दुल सत्तार