Site icon e लोकहित | Marathi News

छोट्या कलाकारांचा मोठा धमाका, ‘द केरळ स्टोरी’ ने १३व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी; वाचून डोळे पांढरे होतील

Smaller blockbuster, 'The Kerala Story' earns 'so many' crores on Day 13; Eyes will become white after reading

‘द केरळ स्टोरी’ ला (The Kerala Story) रिलीज होण्यापूर्वी आणि नंतर खूप वादांना सामोरे जावे लागले. काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदीही घालण्यात आली होती. असे असूनही या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असून पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाने चांगली कमाई केला आहे. ५ मे रोजी प्रदर्शित झालेला केरळ स्टोरी सध्या स्पर्धेत आघाडीवर आहे.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

कमी बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच त्याची किंमत वसूल केली आणि आता फक्त त्याचा नफा वाढत आहे. रिलीजपूर्वी या चित्रपटाला अनेक वादांना सामोरे जावे लागले होते. मात्र, पहिल्या वीकेंडला चित्रपटाने ३५ कोटींहून अधिक कमाई केली. तर, आता केरळ स्टोरी २०० कोटी क्लबच्या दिशेने धावत आहे. ‘द केरळ स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दररोज कोटींची कमाई करत आहे.

Prithvi shaw ने हाफ सेंच्युरी ठोकल्यावर नाशिकच्या मुलीने केले गजब सेलिब्रेशन, तिने पृथ्वीसाठी खास….

चित्रपट प्रदर्शित होऊन १२ दिवस उलटून गेले आहेत. तरीही अजूनही चित्रपटगृहांमध्ये याला भरपूर पसंती मिळत आहे. यासोबतच चित्रपटाची कमाईही चांगली होत आहे. त्याचवेळी, ‘द केरळ स्टोरी’च्या रिलीजच्या १३व्या दिवसाच्या कलेक्शनचे प्रारंभिक आकडेही आले आहेत. १३व्या दिवशी या चित्रपटाने ९.२५ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे हा चित्रपट लवकरच २०० कोटींच्या क्लबमध्ये इन्ट्री करणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Lumpy । शेतकऱ्यांनो सावधान! आटोक्यात आलेला लंम्पी पुन्हा वाढतोय

Spread the love
Exit mobile version