
Snoring Home Remedies । अनेकांना जोरात घोरण्याची सवय असते. त्यामुळे जवळ झोपणाऱ्यांची झोप उडते. घोरण्याची अनेक कारणे असू शकतात. झोपेत असताना श्वसनसंस्थेत अडथळा निर्माण झाल्यास शरीराच्या अंतर्गत पेशींच्या कंपनामुळे नकोसा आवाज येतो. काही लोक थकवा किंवा तणावामुळेही घोरतात. याशिवाय काही आरोग्य समस्यांमुळेही घोरणे होऊ शकते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. चला जाणून घेऊया घोरण्यापासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय…
घोरण्यापासून मुक्त होण्याचे उपाय (Snoring Home Remedies)
- ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे सूज येण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होत नाही. ऑलिव्ह ऑईल घोरणे दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब नाकात टाकल्याने लवकर आराम मिळतो.
- हळद
घोरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी हळद प्रभावी ठरू शकते. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, जे नाकातील रक्तसंचय आणि सूज दूर करण्यास मदत करतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात चिमूटभर हळद मिसळून प्यायल्याने घोरण्याची समस्या दूर होईल आणि तुमची झोपही चांगली होईल.
- मध
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी मध देखील खूप उपयुक्त ठरू शकतो. त्याच्या अँटी-इंफ्लेमेटरी आणि अॅण्टी-मायक्रोबियल गुणांमुळे श्वसनाचा त्रास दूर होण्यास मदत होते. एका ग्लास पाण्यात एक चमचा मध मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्याने लवकर आराम मिळतो.
- देशी तूप
देशी तूप घोरणे दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. देशी तूप थोडे गरम करून त्याचे काही थेंब नाकात टाकावे. असे नियमित केल्याने तुम्ही घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता आणि यामुळे इतर कोणालाही त्रास होणार नाही.
- लसूण
सायनसमुळे घोरणे ही समस्या देखील असू शकते. अशा परिस्थितीत लसूण फायदेशीर ठरू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी लसणाच्या पाकळ्या भाजून कोमट पाण्यासोबत घेतल्याने घोरण्याची समस्या दूर होते.