सेलिब्रिटींच्या बाबत लोकांमध्ये कायम उत्सुकता असते. यामुळे त्यांच्याबाबतच्या सगळ्या गोष्टींवर प्रसारमाध्यमे लक्ष ठेऊन असतात. मागील काही दिवसांमध्ये अनेक सुप्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी आईबाबा झाले आहेत. मात्र त्यांनी कटाक्षाने आपल्या मुलांना लाइमलाईट पासून दूर ठेवले आहे. अनुष्का शर्मा, सोनम कपूर, आलिया भट्ट यांनी आपल्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र त्यांचे चेहरे अजिबात दाखवलेले नाहीत.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ४ जण जागीच ठार
दरम्यान विराट-अनुष्का (Virat-Anushka) यांनी आपली कन्या वामिका हिला सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. एका मुलाखती दरम्यान त्यांनी पापराझींना आपल्या मुलीचा फोटो न काढण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी फोटो न काढू देण्यामागचे कारण देखील स्पष्ट केले आहे. यावेळी ते म्हणाले आहेत की, ” आम्हाला आमच्या बाळाचे आयुष्य खासगी ठेवायचे आहे. आमच्या बाळाला मुक्तपणे आयुष्य जगण्याची संधी मिळावी, यासाठी त्याला मीडिया आणि प्रसारमाध्यमे यापासून लांब ठेवले आहे.”
अदानी ग्रुपसाठी धक्कदायक बातमी, गौतम अदानी टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर
तसेच आलिया-रणबीर ( Aaliya – Ranbir) यांनी देखील सांगितले आहे की, ” आमची राहा किमान दोन वर्षांची होईपर्यंत तिचे फोटो काढू नका. इतकंच नाही तर गाडीत असताना कॅमेऱ्यातून झूम करून जरी तुम्हाला फोटो मिळाला तरी तो कुठेही पोस्ट करू नका. ती मोठी होईल तेव्हा ती ठरवेल तिचे फोटो घ्यायचे की नाही.” याशिवाय सोनम कपूरने ( Sonam Kapoor) देखील आपले बाळ ‘वायू’ चा चेहरा आजपर्यंत सोशल मीडियावर दाखवलेला नाही.
मोठी बातमी! भारतीय सलामीवीर मुरली विजयनं जाहीर केली निवृत्ती