Site icon e लोकहित | Marathi News

OBC reservation । मोठी बातमी! “…तर ओबीसीचं सगळं आरक्षण एकाच दिवशी रद्द होऊ शकतं”

OBC reservation

OBC reservation । लातूर : मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) वाद सुरु आहेत. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आरक्षणावरून आमनेसामने आले आहेत. इंदापूर येथे झालेल्या ओबीसी (OBC) एल्गार सभेत भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर कडाडून टीका (Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal) केली होती. त्याला आता जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Latest Marathi News)

Sukhdev Singh Gogamedi । अॅनिमल चित्रपट पाहिला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुखदेव यांची हत्या केली, पोलिसांनी पकडताच आरोपीने केले धक्कादायक खुलासे

मनोज जरांगे पाटील बोलताना म्हणाले की, “छगन भुजबळ म्हणतील तसा कायदा चालत नाही. शासकीय नोंदी रद्द होत नसून जर कुणबी नोंदी रद्द केल्यास ओबीसींचं सगळं आरक्षण रद्द होईल. (OBC reservation protest) असे झाले तर देशातील सर्व ओबीसींचं आरक्षण रद्द करावं लागू शकत. आमचे पुरावे रद्द होत असतील तर त्यांचं आरक्षण (Reservation) तर कशाच्याच आधारावर दिलं नाही. जात म्हणून दिलेलं आरक्षण आणि व्यवसाय म्हणून दिलेलं आरक्षण मग राहणार नाही, शिवाय आमच्याकडे तर पुरावे आहेत”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. (Maratha Reservation Protest)

bus accident । बिग ब्रेकिंग! मुंबईवरून कोल्हापूरला जाणाऱ्या खाजगी बसचा अतिशय भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू तर अनेक प्रवाशी गंभीर

पुढे ते म्हणाले, “हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदा पारित होईल. शंभर टक्के, त्यांनी 24 डिसेंबरपर्यंत वेळ घेतलेला आहे आणि नाही झाली तर आम्ही लढायला तयार आहोत. महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाच्या शासकीय नोंदी मिळाल्या आहेत. छगन भुजबळ मंत्रीपदाचा गैरवापर करत आहेत,” असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Sukhdev Singh Gogamedi । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! सुखदेव सिंह गोगामेडींच्या मारेकऱ्यांना अटक, ‘ती’ एक चूक पडली महागात

Spread the love
Exit mobile version