पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. यामध्ये महाविकास आघाडी व भाजप टॉपला आहेत. सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते निवडणुकीच्या मैदानात प्रचारासाठी उतरले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार ( Rohit Pawar) यांच्या एका ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चांना उत आला आहे.
युवा शेतकऱ्याची कौतुकास्पद कामगिरी! गव्हाच्या पिकातून साकारली ‘शिवप्रतिमा’
केंद्रीय गृहमंत्री व भाजपा नेते अमित शाह ( Amit Shah) यांच्यावर रोहित पवारांनी एक ट्विट केले असून, हे ट्विट सध्या चर्चेत आहे. त्याच झालं असं की, अमित शाह यांचा पुणे दौरा नुकताच पार पडला. मात्र पुण्यात येऊन देखील त्यांनी कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार केला नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अमित शाह यांना टोला मारला आहे.
फॅशनची ही कोणती तऱ्हा? उर्फी जावेदचे फोटो पाहून नेटकरी हैराण
कसबा आणि चिंचवड मतदारसंघात काय निकाल लागणार? हे अमित शाह यांनी अचूक हेरले आहे, त्यामुळेच त्यांनी पुण्यात येऊन सुद्धा येथे प्रचार केला नाही. अमित शाह यांच्यासारख्या अत्यंत अचूक अंदाज बांधणाऱ्या, सूक्ष्म रणनीतिकार, निवडणूक नियोजनातल्या निष्णात व्यक्तिमत्त्वाने पुण्यात येऊनही कसबा आणि चिंचवडमध्ये प्रचार करणे टाळणे, हे खूप काही सांगून जाणारे आहे.
शरद पवार यांनी ग्रामीण भागातील डॉक्टरांना दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला!
अमित शाह यांनी भाजपाविरोधातील असंतोष आणि संभाव्य ‘निकाल’ हेरला असावा. असे रोहित पवार आपल्या ट्विट मध्ये म्हणाले आहेत. या ट्विट नंतर अमित शाहांनी कसबा चिंचवड पोटनिवडणुकीतील प्रचार का टाळला ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
उद्धव ठाकरेंसमोरील अडचणी वाढल्या; मशाल चिन्ह सुद्धा हातातून निसटण्याची शक्यता