“…म्हणून चंद्रकांत पाटील भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यास अनुपस्थित”

"…so Chandrakant Patil Bhima was absent to salute the Vijayastambha at Koregaon"

मागील काही दिवसांपासून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर विविध स्तरांतून टीका केली जात आहे. इतकंच नाही तर महापुरुषांचा अपमान केला म्हणून त्यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे शाईफेक देखील करण्यात आली होती. दरम्यान भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त ( Shaury Din) विजयस्तंभाला अभिवादन करण्यास उपस्थित न राहिल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही – देवेंद्र फडणवीस

शाईफेक झाल्यापासून चंद्रकांत पाटील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेणे टाळत आहेत. इतकंच नाही तर आवश्यक कार्यक्रमात जाताना ते फेसशिल्ड चा वापर करत आहेत. दरम्यान भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) येथील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील फेसशिल्ड लावून उपस्थित असतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र पुन्हा एकदा शाईफेक होण्याच्या भीतीने त्यांनी या कार्यक्रमास जाण्याचे टाळले असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाकरेंच्या घरात सनई चौघडा वाजणार; आदित्य ठाकरेंचं ‘या’ वर्षी लग्न होणार?

या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक ट्विट करत सर्वच शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी फक्त शाईच नाही तर छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे. मात्र, हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी भिमा कोरेगांवला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येतात, यावेळी अशा एखाद्या घटनेमुळे गालबोट लागावे, जातीय दंगे व्हावे, अशी काही जणांची सुप्त इच्छा आहे. मात्र समाजात दुफळी निर्माण करू पाहणाऱ्यांची इच्छा मी पूर्ण होऊ देणार नाही. असे पाटील यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे.

शिंदे-ठाकरे एकत्र येणार?, शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा मोठा खुलासा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *