
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला रामराम ठोकत भाजप सोबत युती केली आहे. त्यावरून अजूनही राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे फडणवीस सरकार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच आता शिंदे सरकारमधील एका बड्या नेत्याने अजित दादांना सरकारमध्ये येण्यासाठी ऑफर दिली होती.
सर्वात मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर यांना अटक करा, हिंदू महासंघाची मोठी मागणी
अजित पवार यांना दीपक केसकर यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली होती. ते म्हणाले होते, “अजितदादा हे जबाबदार नेते आहेत. त्यांनी बेजबाबदार विधाने करू नये. संजय राऊतांसारखे लोक दररोज बोलत असतात, परंतु त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. अजितदादांची वक्तव्य जनता गांभीर्याने घेत असते. त्यांच्या बद्दल मला आदर आहे”. असं म्हणत त्यांनी अजित पवार यांना पक्षात येण्याची ऑफर दिली होती. आता यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! वर्धापनदिनापूर्वी ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “दीपक केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांना आमदारकीचं तिकीट देण्यामध्ये माझी फार महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे पूर्वाश्रमीचे असलेले संबंध लक्षात घेऊन दीपक केसरकरांना त्याची आठवण आली असेल आणि त्या आठवणीतूनच त्यांच्या तोंडून ते शब्द बाहेर आले असतील,” असं अजित पवार म्हणाले.