मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने त्याच्या प्रियसीला जीवे मारले त्यांनतर तिच्या शरीराचे काही भाग घरात ठेवले आणि काही भाग बाहेर टाकले. घरात मृतदेहाचे तुकडे असल्याने त्याची दुर्गंधी शेजारच्यांनी येऊ लागली त्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे.
‘या’ गोष्टी महाराष्ट्राच्या गौरवतेला शोभणारं नाहीत, शरद पवारांची गंभीर प्रतिक्रिया
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. आरोपी चौकशीमध्ये धक्कदायक खुलासे देखील करत आहेत. त्यामुळे पोलीस देखील हादरून गेले आहेत. आरोपी मनोज साने याने आपल्या कृत्याची कबुली देताना त्यामागचं कारणही सांगितलं आहे.
या घटनेबाबत मनोजने मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला, मला सरस्वतीच्या चारित्र्यावर संशय होता. यामुळे आमची सतत भांडण होत होती त्यामुळे तिने ४ जूनला विष घेतलं आणि त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर सरस्वतीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल आपल्यालाच दोषी धरलं जाईल या भीतीने मी सर्व लपवण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे केले आणि त्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती आरोपीनंच पोलिसांना दिली आहे.