राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते चांगलेच चर्चेत आले आहेत. यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच आता चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला आहे. आता या प्रकरणावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चार पाय आणि चार हात असणाऱ्या मुलाचा ‘या’ ठिकाणी जन्म! सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल
रोहित पवारांनी याबाबत एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले की, “चंद्रकांतदादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतं, त्याचा निषेधच. पण म्हणून त्यांच्यावर केलेली शाईफेक योग्य नाही. थोर व्यक्तींच्या आपण आत्मसात केलेल्या विचाराच्या विरोधात एक विचार अनेक वर्षांपासून काम करत आहे, त्याचा विरोध हा आपण सर्वांनी वैचारिक आणि संवैधानिक मार्गानेच करणं गरजेचं आहे”.
चंद्रकांतदादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतं, त्याचा निषेधच. पण म्हणून त्यांच्यावर केलेली शाईफेक योग्य नाही. थोर व्यक्तींच्या आपण आत्मसात केलेल्या विचाराच्या विरोधात एक विचार अनेक वर्षांपासून काम करत आहे, त्याचा विरोध हा आपण सर्वांनी वैचारिक आणि संवैधानिक मार्गानेच करणं गरजेचं आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 10, 2022
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या भोवती अंगरक्षक असून देखील कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकून हल्ला केलाय. चिंचवड गावामध्ये ते एका कार्यकर्त्याच्या घरी गेले असता त्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला आहे.
मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणी पोलिसांची केली तिघांना अटक