
मागील काही दिवसांत देशामध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे ( Karnataka Assembly Elections 2023) वारे वाहत होते. या निवडणुकीमध्ये कोण आघाडी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. बहुचर्चित कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये काँग्रेस आघाडीवर असून भाजप पिछाडीवर आहे. या निवडणूकीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
Buisness | शेण विकून ‘तो’ दर महिन्याला कमावतो १० लाख! तरुणाचा भन्नाट स्टार्टअप प्लॅन एकदा वाचाच
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी कर्नाटकमध्ये सभा घेतल्या. परंतु, त्याचा जनतेवर काहीही परिणाम झाला नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा येथे फोडोफोडीचे राजकारण केले होते. मात्र यावेळी जनतेने भाजपकडून ही संधी हिरावून घेतली आहे. असे शरद पवार म्हणाले आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणूकीमध्ये ६५ ठिकाणी भाजपला कल आहे तर १३३ ठिकाणी काँग्रेसला विजयाचे संकेत मिळत आहेत. सत्तेचा गैरवापर, साधनांचा गैरवापर, फोडाफोडीचं राजकारण यामुळे वैतागलेल्या जनतेने यामधून भाजपला धडा शिकवला आहे. मुळात कर्नाटकच्या जनतेला भाजपचे हे राजकारण आवडले नव्हते. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसचा विजय झाला आहे.