Sambhaji Bhide । चंद्रपूर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे सतत वादग्रस्त वक्त्यांमुळे (Sambhaji Bhide Statement) चर्चेत येतात. या वक्त्यावरून त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागते. अनेकदा त्यांच्यावर वादग्रस्त वक्त्यांवरून गुन्हा दाखल करण्यात येतो. अशातच त्यांना जेलमध्ये टाकून चक्की पिसायला लावू असा इशारा बड्या नेत्याकडून देण्यात आला आहे. (Latest Marathi News)
“सतत महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. मनोहर भिडे उर्फ वळवळणारे किडे हे पोलीस संरक्षणात फिरतात, राज्यात जर काँग्रेसची (Congres) सत्ता आली तर आम्ही संभाजी भिडे यांना तुरूंगात टाकू आणि त्यांना चक्की पिसायला लावू”, असा इशारा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी दिला आहे. ते क्रांतीभूमी चिमूर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
Icc World Cup । भारतीय संघात मोठा बदल! स्टार खेळाडू अचानक बाहेर, नेमकं कारण काय?
त्यांनी महायुती सरकारवरही जोरदार निशाणा साधला. ” सरकार 3 रिमोटनी चालते. राज्याच्या तिजोरीची लूट चालली आहे. केवळ सत्ताधारी आमदारांचा विकास सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली परंतु यातून मराठवाड्याच्या जनतेला काहीही मिळालेले नाही. मराठवाड्यात सरकारी घोषणांचा कोरडा पाऊस पडला,” अशी खोचक टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Accident News । गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, एक ठार तर १९ जण जखमी