सोशल मीडिया हे एक महत्त्वाचे माध्यम बनले आहे. भरपूर लोक याठिकाणी सक्रिय असतात. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, whatsapp या प्लॅटफॉर्मसवर लोक हजेरी लावतात. त्यातल्या त्यात इन्स्टाग्राम वरील ‘रिल्स’ हा लोकांच्या आवडीचा विषय आहे. अगदी थोड्या वेळाचे छोटे छोटे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असतात. दरम्यान इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अनेक रिल्सस्टार्स रिल्स बनवून पैसे कमावतात. त्यांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ( Social Media Influencer) म्हंटले जाते. ‘डॅनी पंडित’ हा यातीलच एक ! त्याच्या व्हिडीओं ना लोकांनी पसंती दिली आहे. ( Danny Pandit’s inspiring story)
आजपर्यंत अतरंगी रॅपर, टिपिकल पुणेरी मुलगा, जादूगर मोहन अशी वेगवेगळी पात्रे त्याने आपल्या इन्स्टाग्राम रील्समधून लोकांपर्यंत पोहोचवली आहेत. नुकतीच त्याने जोश टॉक्स ( Josh Talks) वर हजेरी लावली. यावेळी डॅनी पंडित याने आपल्या जीवन प्रवासाबद्दल सांगितले आहे. डॅनी पंडित हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे. सुरुवातीला त्याला खूप टोपणनावे होती. मात्र, एका व्यक्तीने त्याला सुप्रसिद्ध अभिनेता डॅनी डेन्झोंग्पावरून डॅनी हे नाव ठेवले होते. हे नाव आवडल्याने त्याने मुकेश ऐवजी डॅनी पंडीत हेच नाव पुढे लावायचे ठरवले.
डॅनीला लहानपणापासून असे व्हिडिओ करायची सवय होती. लहान असताना तो आपल्या ताईचा मोबाईल घेऊन व्हिडीओ करायचा. डॅनीच्या वडिलांचे पानचे दुकान होते. डॅनीने बीकॉम, एलएलबी व कंपनी सेक्रेटरीचे शिक्षण घेतले आहे. मात्र रिल्स मुळेच आज तो घराघरांत पोहोचला आहे. नुकताच लोकमत कडून त्याचा सन्मान देखील करण्यात आलेला आहे.
Holiday Package | हॉलिडे पॅकेजचे आमिष दाखवून फसवणूक! पुणेकरांचे कोट्यवधींचे नुकसान…