राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. एक ‘ उपक्रमशील नेता’ म्हणून ते विशेष प्रसिद्ध आहेत. मध्यंतरी त्यांनी महाराष्ट्रातील युवकांसाठी ‘महाव्हिजन फोरम’ नावाचा उपक्रम सुरू केला आहे. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी ते #AskRohitPawar या ट्रेंडमुळे चर्चेत होते. दरम्यान त्यांची एक मुलाखत चांगलीच चर्चेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा! कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मिळाले घड्याळ चिन्ह
‘मराठी किडा’ या सुप्रसिद्ध युट्यूब चॅनेलसाठी आमदार रोहित पवार यांनी नुकतीच मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून राजकिय आयुष्यापर्यंतचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे रोहित पवारांनी देखील लोकांच्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली आहेत.
‘मविआ’च्या उद्याच्या सभेला अजित पवार गैरहजर राहणार? नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण
यामध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाबाबत एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) चिन्ह असलेल्या घड्याळात ( Clock) नेहमी दहा वाजून दहा मिनिटे का असतात? असे मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले होते.
या विकेंडला घर बंदूक बिर्याणी पाहा अगदी स्वस्तात; चित्रपटाच्या टीमने दिलीय विशेष ऑफर
यावेळी रोहित पवार ( Rohit Pawar) म्हणाले की, घड्याळात १० वाजून १० मिनिटे झाली की विजयी चिन्ह तयार होते. तसेच राष्ट्रवादीची स्थापना सुद्धा १० वाजून १० मिनिटांनी झाली होती. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेल्या घड्याळात नेहमी 10 वाजून 10 मिनिटे झालेली असतात.