‘किसी का भाई किसी की जान’ हा सलमान खानचा ( Salman Khan) नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सलमान खान सध्या व्यक्त असून २१ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट म्हणजे सलमान खानकडून आपल्या चाहत्यांना ईदचे गिफ्ट असणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या पार्श्वभूमीवर सलमानखानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ( Kisi ka Bhai Kisi Ki Jan)
सावधान! तुम्हीही कलिंगडावर मीठ टाकून खाताय का? तर हे एकदा वाचाच
या व्हिडीओमध्ये सलमान खान म्हणत आहे की, “मी शांतिप्रिय माणूस आहे. मात्र जर कोणीही माझ्या कुटुंबावर हल्ला केला तर गुंड बनण्यापासून मला कोणीच रोखू शकणार नाही.” एवढच नाही तर यापुढे सलमान म्हणतो की, मी तुमच्यासाठी ईदी घेऊन तयार आहे. चला मला भेटा मला आणि माझ्या ‘किसी का भाई किसी की जान’ या कुटुंबाला.”
वडील सचिन तेंडुलकरकडून मिळाले अर्जुनला आजवरचे सर्वोत्तम गिफ्ट!
सलमान खानचा हा चित्रपट कौटुंबिक ड्रामावर आधारित आहे. यामध्ये सलमान खान आपल्या कुटुंबासाठी शत्रूसोबत दोन हात करतो. सलमान मोठ्या कालावधीनंतर पडद्यावर येत आहे. तसेच ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होतोय यामुळे सलमानखानच्या या चित्रपटासाठी प्रेक्षकवर्ग उत्सुक आहे.
सावधान! तुम्हीही कलिंगडावर मीठ टाकून खाताय का? तर हे एकदा वाचाच