Site icon e लोकहित | Marathi News

“…तर संजय राऊत शरद पवारांच्या मांडीवर बसलेले असतील”; शिंदे गटातील आमदाराकडून गौप्यस्फोट

राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेच्या शिंदे गट व ठाकरे गटातील संघर्ष अगदी टोकाला गेला आहे. याचे पडसाद या हिवाळी अधिवेशनात देखील पहायला मिळाले. सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंडाचा आरोप केला आहे. यावरून शिंदे गटाकडून आक्रमक उत्तरे दिली जात आहेत. दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी या मुद्द्यावरून ठाकरे गटाला धारेवर धरले असून यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

हरियाणा सरकारकडून राहुल गांधी यांच्या टीशर्ट वरून अजब टीका; भारत जोडो यात्रा थांबण्यासाठी लिहिले ‘हे’ पत्र

एकनाथ शिंदे शिवसेनेत असताना, शिवसेनेची सत्ता होती परंतु त्यावेळी कुठल्याही गोष्टीची चौकशी केली गेली नाही. मात्र, आता एकनाथ शिंदे यांची सत्ता आहे आणि त्यांचे काम व्यवस्थित सुरू आहे. यामुळे विरोधकांकडून रिकामे आरोप केले जात आहेत. तसेच सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP) चालवत आहे. असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कोचर दांम्पत्याला सीबीआय कडून अटक

याशिवाय संजय राऊत हे सध्या शिवसेनेचे नाही तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. ज्या दिवशी शिवसेना संपेल त्यादिवशी संजय राऊत पवारांच्या मांडीवर बसलेले असतील असा टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट ( Sanjay Shirsat) यांनी संजय राऊत ( Sanjay Raut) यांना लागवला आहे.

दाक्षिणात्य व बॉलिवूड चित्रपटांमध्ये तुलना केली जाऊ नये; ‘केजीएफ’ स्टार यशचे मोठे वक्तव्य

Spread the love
Exit mobile version