राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (BAMU) आज डी.लिट (D.lit) ही पदवी दिली आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमात शरद पवार भावुक झालेले पहायला मिळाले. महाराष्ट्राच्याच न्हवे तर देशाच्या राजकारणात आपला ठसा उमटवणारे शरद पवारांसारखे खंबीर नेते असे भावुक झाल्याने उपस्थित थक्क झाले होते.
बिग ब्रेकिंग! अभिनेत्री तबस्सुम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
या विद्यापीठाच्या योगदान आढाव्या संदर्भात दाखविण्यात आलेला माहितीपट ( Documentry) पाहताना शरद पवारांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले होते. या माहितीपटात नामांतर विस्तार आंदोलनातील शरद पवारांचे योगदान दाखविण्यात अधोरेखित करण्यात आले. हे पाहताना शरद पवार भावनिक झाले होते. खरंतर या विद्यापीठाच्या नामांतरासाठी शरद पवारांना सत्तेवर पाणी सोडावं लागलं होतं.
जनावरांची खरेदी-विक्री करा फक्त एका क्लिकवर; खास पशुपालनासाठी नवे अॅप!
या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी मराठवाडा विद्यापीठाच्या निर्मितीच्या काळाबद्दल सांगितले. तसेच हे राज्यातील एक ऐतिहासिक विद्यापीठ असल्याचे देखील सांगितले. दरम्यान शरद पवारांनी विद्यापीठाच्या स्थापनेवेळीच्या अनेक घडामोडींना उजाळा दिला. तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विद्यापीठासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सुद्धा त्यांनी माहिती दिली.
दरोड्याच्या गुन्ह्यांत श्रीगोंद्यातील तिघांना अटक; वाचा सविस्तर