Site icon e लोकहित | Marathi News

“…तर लवकरच महाराष्ट्राचा बिहार होईल”, ‘या’ लावणीसम्राज्ञीने गौतमी पाटीलवर केली जोरदार टीका

"...so soon Maharashtra will become Bihar", 'this' Lavani empress strongly criticized Gautami Patil

लावणी कलाकार गौतमी पाटील मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्या लावणी करण्याच्या शैलीवरून तिला ट्रोल केले जात आहे. महिन्यांपूर्वी गौतमीचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ आणि त्यानंतर तिच्याच कार्यक्रमादरम्याम एका तरुणाचा झालेला मृत्यू, यामुळे गौतमी पाटील (Gautami Patil) वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. अजूनही तिच्यावर टीका करणे सुरूच आहे.

सोशल मीडियावर अफवा पसरवताय तर सावधान! अन्यथा होऊ शकते आजन्म कारावासाची शिक्षा

‘लावणीच्या नावावर गौतमी पाटील अश्लीलतेचे प्रदर्शन करते’ असा गंभीर आरोप तिच्यावर केला जातोय. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर ( Surekha Punekar) यांनी माध्यमांशी बोलताना गौतमी पाटीलला चांगलेच धारेवर धरले. अंगविक्षेप करुन कला सादर करणाऱ्या लावणी साम्राज्ञीला लोक सोडणार नाहीत. ज्या लावणीसम्राज्ञीकडे कला आहे, तिला प्रोत्साहन दिले पाहिजे. अपुरे कपडे घालणे आणि अश्लील वर्तन करणे, स्टेजवर चुकीचे हावभाव करुन नाचणे याला लावणी म्हणत नाहीत. अशा स्पष्ट शब्दांत सुरेखा पुणेकर यांनी गौतमी पाटीलचा पाणउतारा केला आहे.

कामाख्या देवीच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले; “कामाख्या देवीचं मंदिर हे…”

इतकंच नाही तर लावणी कलेला योग्यरित्या सादर केले गेले पाहिजे. अन्यथा लोक महिलेला स्टेजवर जाऊन मारतील. जी कलाकार चांगली आहे, तिला तुम्ही नक्कीच डोक्यावर घ्या. पण अश्लील वर्तन करणाऱ्या, अपुरे कपडे घालणाऱ्या लावणी सम्राज्ञीला तुम्ही अजिबातच स्थान देऊ नका. नाहीतर महाराष्ट्राचा सुद्धा बिहार होईल, असेही सुरेखा पुणेकर म्हणाल्या आहेत.

अरे वा! रानडुकरांना शेतातून पळवण्यासाठी शेतकरी पुत्राने केली वेगळी आयडिया; वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version