
शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह कुणाचं? या बहुचर्चित प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडेच धनुष्यबाण हे चिन्ह राहील, असे निवडणूक आयोगाने आज स्पष्ट केले आहे. यामुळे मागील 6 दशकांपासून असलेले शिवसेना व ठाकरे कुटुंब हे नाते संपुष्टात आले आहे.
दरम्यान शिवसेना (Shivsena) पक्षाचा धगधगता इतिहास आज प्रत्येक मराठी माणसासमोर उभा राहिला असेल. मुंबईमधील मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या युवकांना आवाज मिळवून देण्यासाठी शिवसेना या संघटनेचा जन्म झाला आहे. असे शिवसेनेच्या संस्थापकांनी वेळोवेळी म्हंटले होते.
कोंबड्यांने घेतला मालकाच जीव; तडफडत तडफडत मालकने सोडले प्राण
बाळ ठाकरे या तरुण व्यंगचित्रकाराने म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली होती. शिवछत्रपतींच्या नावावरून या संघटनेचे नाव ‘शिवसेना’ ठेवण्यात आले होते. सुरुवातीला डरकाळी फोडणारा वाघ ही शिवसेनेची ओळख होती. नंतरच्या काळात शिवसेनेने रेल्वे इंजिन, ढाल तलवार, कमळ अशा अनेक चिन्हांसोबत निवडणूका लढवल्या.
हा काळ आयोध्येच्या राम मंदिर आंदोलनाचा होता. यावेळी बाबरी मशीद पाडून तिथे प्रभू रामाचं मंदिर उभं राहावं यासाठी शिवसेना सुद्धा आक्रमक होती. दरम्यान हिंदुत्वाची आपली ओळख घट्ट व्हावी आणि प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद म्हणून शिवसेनेनं धनुष्यबाण हेच पक्ष चिन्हं फायनल केले.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं
यानंतर जवळपास तीस वर्षे धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेनेने अनेक निवडणूका लढवल्या. धनुष्यबाण ही शिवसेनेची ओळख आहे आणि शिवसेना ही ठाकरेंची ओळख आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या (Election commission) आजच्या निर्णयाने शिवसेना व ठाकरे हे समीकरण कायमसाठी बदलले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर संजय राऊत संतापले; म्हणाले,”हे कोणाचेतरी गुलाम…”