अधेमध्ये कधीतरी आपल्या डोळ्यांची पापणी फडफडते. यावरून अनेक हास्यास्पद तर्कवितर्क लावले जातात. घरी पाहुणे येणार असले किंवा हाती भरपूर पैसे येणार असले की डोळे फडफडतात अशी अध्यात्मिक मान्यता आहे. ( Spiritual think) महत्त्वाची बाब म्हणजे अनेक लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात. मात्र डोळ्यांची (Eyelashes movements) पापणी फडफडण्यामागील वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहित आहेत का ? (Scientific Fact)
डोळ्यांचे मज्जातंतू हे पापणी फडफडण्याचे सर्वात मोठे व महत्त्वाचे कारण आहे. डोळे हा अतिशय नाजूक व संवेदनशील अवयव आहे. यामुळे मज्जातंतू होणारी छोटीशी संवेदनासुद्धा पापणी फडफडण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. बऱ्याचदा थोडा वेळ गेला की पापणी फडफडणे आपोआप थांबते. मात्र कधीकधी पापणी सलग फडफडत राहते आणि ती थांबण्यास वेळ लागतो. डोळे थकलेले असले की असे होते.
‘या’ दिवशी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येऊ शकतो; वाचा सविस्तर
बराच वेळ डोळे एकाग्र करून तुम्ही एखादे काम करत असाल, जसे की पुस्तक वाचने, संगणक हाताळणे, मोबाईल पाहणे तर तुमचे डोळे थकून जातात. यामुळे डोळ्यांच्या यंत्रणेत असंतुलन निर्माण होऊन पापणी फडफडते. बऱ्याचदा मानसिक तणावात असल्यास सुद्धा पापणी फडफडते. अशा वेळी हाताच्या मधल्या बोटाने डोळ्याच्या खाली ३० सेकंद मसाज करा. तुम्हाला लगेच आराम मिळेल.