शिंदे व ठाकरे गटातील बहुप्रतिक्षित सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे ( Maharashtra) लक्ष लागले आहे. या निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरणे ( Political equations) बदलणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सुद्धा यावरून धाकधूक आहे. दरम्यान उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे वक्तव्य प्रसिद्ध कायदेतज्ञ उल्हास बापट ( Ulhas Bapat) यांनी केले आहे.
” विधानसभेच्या आताच्या अध्यक्षांकडे अपात्रतेचा निर्णय असणार आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने याबाबतीत फार कठीण निर्णय दिला की, राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावलेले सत्र मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने बोलावले नव्हते. त्यामुळे राज्यपालांचे आदेश चुकीचे आहेत, असा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने लावलाच तर सर्वोच्च न्यायालय स्टेट्सको अँटी निर्माण करू शकते. म्हणजेच आधीची स्थिती पूर्ववत करू शकते. यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात,” असे मत उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे.
“…म्हणून फडफडतात डोळ्यांच्या पापण्या”; ‘हे’ आहे खरे वैज्ञानिक कारण
सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षांचा निकाल आत्ता दिला नाही तर निवृत्त झालेल्या न्यायाधीशांच्या जागी नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करुन संपूर्ण सुनावणी प्रक्रिया पुन्हा पार पाडावी लागेल. तसेच सर्वोच्च न्यायालयाने जरी निकाल दिला तरी अपात्रते संदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्षांकडेच सोपवला जाऊ शकतो. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झाल्यास, सरकार पडून नवीन गणिते जुळली नाहीत, तर राज्यात थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. असे देखील कायदेतज्ज्ञांंचे म्हणणे आहे.
‘या’ दिवशी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येऊ शकतो; वाचा सविस्तर