Social Media । काय सांगता? येत्या २ वर्षात जगातील निम्मे यूजर्स सोशल मीडियाला ठोकणार रामराम; सर्वेक्षणात धक्कादायक माहिती उघड

Social Media

Social Media । सध्या आपल्याकडे अनेकजण सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात करतात. सोशल मीडिया बद्दल जर पाहिले तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी मिळतात. मात्र सध्या सोशल मीडियावर नकारात्मकता मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्याचे दिसत आहे. यामुळे कंपन्यांना मोठा तोटा होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. (Social Media Toxicity )

Bad Phone Charging Habits । स्मार्टफोन चार्ज करताना ‘ही’ चूक टाळा नाहीतर होईल मोठे नुकसान, मोबाईलचा होईल स्फोट; मुलांना विजेचा धक्का बसण्याची शक्यता

फेक न्युज आणि चुकीच्या माहितीमुळे जगभरातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोक 2025 सालापर्यंत सोशल मीडियाला रामराम ठोकू शकणार आहेत. गार्डनर नावाच्या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात (Gartner Survey) ही बाब उघड झाली आहे.गार्टनर मार्केटिंगच्या वरिष्ठ संशोधक एमिली वेईस यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सोशल मीडिया हा डिजिटल मार्केटिंग साठीचा सध्या सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे. मात्र अनेक लोक हे सोशल मीडिया फार कमी वापरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

OnePlus 12R । मोबाईल खरेदी करताय तर थांबा, OnePlus 12R स्मार्टफोन ‘या’ दिवशी होतोय लॉन्च; जाणून घ्या किंमत किती असेल?

सध्या चर्चेत असलेल्या एआयमुळे देखील मोठ नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे. याचं कारण असं की, सर्वेक्षणामध्ये युजर्सना सोशल मीडिया (Social Media Users) आणि जनरेटिव्ह एआयबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावेळी दहा पैकी सात युजर्सने असं म्हटलं आहे की, जनरेटिव्ह एआयमुळे सोशल मीडिया युजर एक्सपिरीयन्सला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar । राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणाबाबत शरद पवार यांनी केले मोठे वक्तव्य

मागच्या काही वर्षांपूर्वी युजर अगदी मोकळेपणाने सोशल मीडियाचा वापर करत होते. त्यावर वैयक्तिक माहिती शेअर करत होते पोस्ट देखील मोठ्या प्रमाणात शेअर करत होते. मात्र अलीकडेच या गोष्टीचं प्रमाण कमी झाले आहे. यामुळे कंपन्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या बदलत्या स्वरूपावर काम करणं गरजेचं आहे असे देखील एमिली म्हणाल्या.

Ram Mandir | 16 बिघा जमीन विकली, नातेवाईकांकडून उसने घेतले, राम मंदिरासाठी या व्यक्तीने दिले 1 कोटी रुपये

Spread the love