Solapur News । सोलापूरमध्ये महायुतीला मोठा धक्का; शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाचे नेते महाविकास आघाडीत सामील

Solapur News

Solapur News । सोलापूर जिल्ह्यात महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी मोठा धक्का बसला आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde group) आणि अजित पवार गटाचे (Ajit Pawar group) दोन प्रमुख नेते महाविकास आघाडीत सामील झाले आहेत. अजित पवार गटातील सुरज देशमुख आणि रावसाहेब देशमुख या बंधूंनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

Ajit Pawar | अजित पवारांच्या तब्येतीत बिघाड, डाॅक्टरांनी दिली मोठी अपडेट

या पक्षप्रवेशामुळे माढा विधानसभा मतदारसंघातील आमदार बबनदादा शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. बबन शिंदे या मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून आले आहेत आणि त्यांनी आता आपल्या सुपुत्र रणजीत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. या घटनाक्रमामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाला मोठी राजकीय हानी झाली आहे.

Sharad Pawar । राजकारणातून मोठी बातमी! शरद पवारांनी टाकला मोठा डाव?

जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या दोन नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला असून, राजकीय वर्तुळात विजयसिंह मोहिते पाटलांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डी. एस. सावंत यांनी देखील शिंदे गटाला रामराम करत, आमदार शहाजी बापू पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, शिंदे गटातील जिल्ह्यातले पदाधिकारी आणि आमदार नीट वागत नाहीत, त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला आहे. सावंत यांनी यावेळी भविष्यात अनेक पक्ष प्रवेश होतील असा इशारा दिला आहे.

Jaideep Apte arrested । सर्वात मोठी बातमी! जयदीप आपटेला अटक; अंधाराचा फायदा घेत बायको व आईला भेटायला आला होता

Spread the love