Site icon e लोकहित | Marathi News

Solapur Tuljapur Highway Accident । सोलापूर-तुळजापुर महामार्गावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; प्रवासी जखमी

Solapur Tuljapur Highway Accident

Solapur Tuljapur Highway Accident News । सध्या अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर-तुळजापूर महामार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये जवळपास सहा प्रवासी जखमी झाले आहेत. (Solapur Tuljapur Highway Accident News)

Salman Khan Viral Video । सलमानने भर गर्दीतच महिला पत्रकाराला केलं किस; व्हिडीओ झाला व्हायरल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर कडून लातूर कडे जाणाऱ्या बस चालकाचे कासेगाव जवळ स्टेरिंगवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आढळली आणि हा अपघात झाला आहे. बस अचानक खड्ड्यात आढळल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. या अपघातामध्ये काही प्रवाशांना किरकोळ तर काही प्रवाशांना मुका मार लागला आहे.

Rohit Pawar । रोहित पवार यांना मोठा धक्का! कट्टर समर्थक राम शिंदेंकडे जाणार?

त्याचबरोब, र या अपघातामध्ये सहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या बसमधून प्रवास करणारे प्रवासी हे पुणे, कर्नाटक आणि मराठवाड्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर लगेचच घटनास्थळी तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी धाव घेतली यानंतर बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यानंतर जखमी लोकांना रुग्णालयात पाठवण्यात आले.

Shrigonda News । संभाजी ब्रिगेडच्या ठिय्या आंदोलनाच्या इशारा नंतर रस्त्याचे रखडलेले काम सुरू

Spread the love
Exit mobile version