महाराष्ट्रात सध्या अनेक रेल्वे मार्गांचे काम प्रगती पथावर सुरू आहे. तसेच राज्यातील अनेक रेल्वे मार्ग प्रस्तावित आहेत. मोठ्या शहरातील व ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे रेल्वे मार्ग अधिक उपयोगी ठरणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये देखील खास रेल्वे विभागासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्गाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
“…ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत? रोहित पवार यांचे ट्विट चर्चेत
सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद या रेल्वेमार्गामुळे तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर आणि अक्कलकोट या धार्मिक स्थळांमधील कनेक्टिव्हिटी (connectivity) सुधारणार आहे. यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. या रेल्वेमार्गाच्या कामासाठी लवकरच सुरुवात होणार असून भूसंपादनासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी जवळपास पूर्ण झाली आहे. यामध्ये फक्त कसबे सोलापूर येथील जमीन मोजणी रखडली आहे. मात्र पुढील आठ दिवसांत ही जमीन मोजणी सुद्धा पूर्ण होईल.
पायात घालायला नाहीत शूज! अन् 15 वर्षांची मुलगी सुर्यकुमार यादवच्या स्टाईलमध्ये मारते सिक्स
अर्थसंकल्पामध्ये (Budget 2023) या रेल्वे मार्गासाठी सुमारे 110 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा रेल्वे मार्ग सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर सोलापूर (Solapur) तालुक्यातील एकूण नऊ गावात प्रस्तावित आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या रेल्वेमार्गासाठी (Railway) जवळजवळ 185.42 हेक्टर जमीन वापरली जाणार आहे. यामुळे रेल्वेमार्गावरील पाच हजार 67 शेतकरी बाधित होणार आहेत.
बाॅलिवूडला शिंदे- फडणवीस सरकारचा दणका ; बॉलीवूडवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच नियमावली होणार जारी