
Rain in Maharashtra । संपूर्ण देशभरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Rain) पडत आहे. तरीही देशाचा काही भाग अजूनही तहानलेला आहे. कारण राज्यात काही भागात पावसाने (Rain in Maharashtra) पाठ फिरवली आहे. अनेक शेतकऱ्यांनी थोड्याशा पाण्यावर पेरण्या केल्या आहे. परंतु पेरण्या पूर्ण झाल्यानंतर पावसाने या भागात दडी मारली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर सध्या दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. (Latest Marathi News)
नाशिक येथील ‘त्या’ अपघातावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar) मागील महिन्याच्या शेवटी थोडा पाऊस झाला होता. तेव्हा शेतकऱ्यांनी उडीद, सोयाबीन, कापूस, मूग आणि बाजरीच्या जवळपास ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, परंतु लागवडीनंतर या भागात पावसाने पाठ फिरवली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असले तरीही पावसाचा थेंब पडत (Rain in Ahmednagar) नाही, त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Delhi Crime । महिलेच्या शरिराचे तुकडे करून फेकले पुलाजवळ, धक्कादायक घटनेने दिल्ली पुन्हा हादरली
पाऊस नसल्याने जमिनीतील ओलावा गेला आहे. त्यामुळे लागवड केलेली कपाशी जळण्याची शक्यता आहे. बोधेगाव कृषी मंडळांतर्गत २२ हजार २१२ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून यात सर्वात जास्त १४ हजार ८८० हेक्टर क्षेत्र कपाशीचे आहे. समजा जर येत्या चार ते पाच दिवसांत या भागात पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते.
यावर्षी राज्यात पावसाने उशिरा हजेरी लावली. परंतु राज्याच्या अनेक भागात त्याने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. परंतु काही भागात पुरेशा पावसाअभावी दुष्काळाचे ढग जमा व्हायला सुरवात झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर मोठा ताण पडला आहे.
हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पुन्हा ढगफुटी! मुसळधार पावसामुळे 90 जणांचा मृत्यू