प्रत्येकाच्या आयुष्यातील लग्न (Marriage) हा खूप महत्त्वाचा दिवस असतो. त्यामुळे अनेकजण त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो. हल्ली तरुणांमध्ये विवाहाचा प्रश्न दिवसेंदिवस अवघड बनत चालली आहे. अशातच फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाणही खूप वाढले आहे. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे, आपली फसवणूक झाल्याचे समजताच वधूच्या घरच्यांनी वर मंडळींना चांगलाच चोप देऊन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)
पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना बसणार मुसळधार पावसाचा तडाखा, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या (Bihar) नालंदा (Nalanda) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्न ठरलेल्या दिवशी वर मंडळी नववधूच्या दारात वरात घेऊन आली. परंतु वरात पाहून नववधूच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण लग्नापूर्वी असलेला वर आणि लग्नाच्या दिवशी वरात घेऊन आलेला वर वेगळा होता. हा दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा चुलत भाऊ वर बनून आला होता.
मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांचा जवळचा आणि विश्वासू पदाधिकारी शिंदे गटात जाणार? चर्चांना उधाण
तसेच वधूच्या घरच्यांनी लग्नाला नकार देत साखरपुड्यासाठी खर्च करण्यात आलेले 1 लाख रुपयांची रक्कम परत मागितली. त्यावरून नववधूच्या मंडळींनी नवरदेवासह वरातीतील मंडळींना मारहाण केली. हे प्रकरण इतके टोकाला गेलं की पोलिसांना (Bihar Police) त्यात मध्यस्ती करावी लागली.
“फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा”, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
हे ही पहा