Accident News । अतिउत्साह नडला! हनिमूनला गेलेल्या जोडप्यासोबत घडलं असं काही की…. नवरीला गमवावा लागला जीव

Accident News

Accident News । नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियाचा (Social media) वापर खूप वाढला आहे. प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. तरीही काहीजण जीवघेणे स्टंट थांबवत नाहीत. सध्या अशीच काहीशी घटना घडली आहे. अतिउत्साहाच्या भरात हनिमूनला (Honeymoon) गेलेल्या जोडप्यासोबत (Couples) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे नवरीला जीव गमवावा लागला आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar । एकनाथ शिंदे नाराज? फडणवीस यांच्या लेटर बॉम्बनंतर महायुतीत अजित पवार एकटे

बहामासमध्ये (Bahamas) वॉटर स्पोर्ट्सदरम्यान (Water sports) एक भीषण अपघात (Accident) झाला असून यात एका शार्कने नवविवाहित महिलेचा जीव घेतला आहे. ही नवविवाहित महिला बहामासमधील सँडल्स रिसॉर्टपासून थोड्या अंतरावर पॅडलबोर्डिंग करत होती, त्यावेळी तिच्यावर शार्कने हल्ला केला. दरम्यान, हल्ल्यावेळी महिला तिच्या पतीसोबत होती. याबाबतचा एक एक व्हिडिओ देखील व्हायरल (Viral Video) झाला आहे.

Snoring Home Remedies । या 5 घरगुती उपायांनी, घोरण्याची समस्या कायमची दूर होईल, जाणून घ्या…

महिला तिच्या पतीसोबत पॅडलबोर्डिंग (Paddleboarding) करत असताना पाण्यातून बाहेर आलेल्या शार्कने अचानक तिच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर तिला तातडीने ड्यूटीवर असणाऱ्या लाइफगार्डने तिला सुरक्षित स्थळी नेऊन सीपीआर दिला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले परंतु तिचा प्राण गेला. लग्नाच्या एक दिवसानंतर नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्यांनतर तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Google ने Play Store वरून 17 फसवणूक कर्ज अॅप्स डिलीट केले, जाणून घ्या कोणते ते?

Spread the love