
मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ म्ह्णून तिला ओळखले जात. मागच्या काही दिवसांपूर्वी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनाली-कुणाल पुन्हा एकदा थाटामाटात विवाहबंधनात अडकले. पण सोनालीने आत्तापर्यन्त तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नव्हते. पण आता तिच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून वेबसिरीज आणणाऱ्या प्लँनेट मराठीवर हा विवाह सोहळा प्रेक्षकांना पाहता येईल. यावर बोलताना सोनाली म्हणाली, “लग्न या गोष्टीबद्दल मला पहिल्यापासून आकर्षण होतं. अनेक अडचणी, पँडेमिक आले तरी मला चार वेगवेगळ्या पद्धतीने लग्न करायचं होतं. या सगळ्या गोष्टींवर मात करुन माझं हे स्वप्न पूर्ण होतंय.”
सोनालीच्या लग्न सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हयरल होत आहे. चाहते पुन्हा एकदा या जोडप्याचे अभिनंदन करताना दिसत आहेत.