
बॉलीवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) नेहमीच त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतो. सोनू सूद सोशल मीडियावर (Social Media) देखील सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनू सूद चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती देत असतो. यादरम्यान सोनू सूद एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
मोठी बातमी! गंगा नदीत 1700 कोटींचा पूल कोसळला अन्… व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का
नुकत्याच झालेल्या ओडिशा रेल्वे अपघातामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत 200 हून अधिक रेल्वे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, तर दुसरीकडे 900 लोक जखमी झाले. आता बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्याने याबद्दल माहिती दिली आहे.
बिबट्या घरात घुसला, शिकारही सापडली नाही मग त्याने पळवली ‘ही’ वस्तू; व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
सोनू सूद शेअर केल्या व्हिडीओमध्ये म्हणाला की, “मित्रांनो, गेल्या काही काळापासून आम्ही ओडिशामध्ये कोणती कुटुंबे आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. रेल्वे दुर्घटनेचा मोठा फटका बसला आहे. काही लोकांनी आपले कुटुंबीय गमावले आहे. तर काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. आता ते आपले जीवन कसे जगतील हे माहित नाही.”
सर्वात मोठी बातमी! कोल्हापुरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार
तसेच,“अपघातग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी आम्ही एक हेल्पलाइन क्रमांक 9967567520 जारी केला आहे, जो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही आम्हाला या क्रमांकावर पीडितेच्या कुटुंबाशी जोडू शकता. त्यामुळे कृपया यावर तुम्ही मेसेज पाठवा. तुम्हाला या नंबरवर कॉल करण्याची गरज नाही, फक्त एसएमएस पाठवा. तुम्ही आम्हाला त्या कुटुंबात सामील करा. त्यांना पुन्हा त्यांच्या पायावर कसे उभे करायचे याचा प्रयत्न आम्ही करू. पीडित कुटुंबाला नोकरी, व्यवसाय, मुलांच्या शिक्षणाबाबत सर्वतोपरी मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहील.