दूध उत्पादकांसाठी दिलासादायक! गाई दूध दरात 3 आणि म्हैस दरात 2 रुपयांनी वाढ

Soothing for milk producers! 3 increase in cow milk price and Rs 2 increase in buffalo price

राज्यात (Maharashtra) मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान अशातच आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. याच कारण म्हणजे सध्याच्या परिस्थितीत दूध (Milk) दरात वाढ होताना दिसत आहे. दरम्यान वारणा दूध संघ शेतकर्‍यांना गायीच्या खरेदी दुधास प्रतिलिटर 3 रुपये तर म्हैस दूध खरेदीस प्रतिलिटर 2 रुपये दरवाढ देण्याची घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! 35 हजार शेतकऱ्यांचे तब्बल 964 कोटींची कर्ज माफ होणार, मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय

याबाबतची संपूर्ण माहिती संघाचे अध्यक्ष, आमदार डॉ.विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी दिली. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर ही दुधाचे दर वाढल्याने दूध उत्पादक शेतकर्‍यांतून समाधानाचे वातावरण आहे. इतकंच नाही तर सध्या राष्ट्रीय स्तराबरोबरच जागतिक बाजारपेठेत दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून लंपी सारख्या आजारामुळे अनेक जनावर मृत्युमुखी पडली. त्यामुळे दूध उत्पादनात थोडा तुटवडा जाणवत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, ‘या’ तारखेला18 हजार पोलीस भरतीची जाहिरात निघणार

इतकंच नाही तर दूध उत्पादकांना वैरण टंचाईसह अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या संकटामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये म्हणून म्हणून वारणा दूध संघाने शेतकर्‍यांना पाठबळ दिले आहे. महत्वाची बाब म्हणजे आता अमृत पशुधन सुरक्षा कवच योजनेतूंन दूध उत्पादकांना 30 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत होत आहे. तसेच कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सध्या वेगवेगळे उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले.

Sanjay Datt: “मी आता साउथचे सिनेमे जास्त करणार”, संजय दत्तचं मोठं विधान, कारण आल समोर…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *