कांद्याचे वाढलेले दर अचानक कमी झाल्याने शेतकरी मध्यंतरी चिंतेत होते. परंतु,या आठवड्यात धान्य बाजार चांगलाच तेजीत आहे. इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मालदांडी ज्वारीला 5001 रुपये इतका दर मिळत आहे. इतकेच नाही तर डाळिंबाचे दर देखील वाढले आहेत.
मोठी बातमी! ‘कसौटी जिंदगी की’ फेम सिद्धांत वीर सुर्यवंशीचं निधन; ४६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
या आठवड्यामध्ये इंदापूर – भिगवण ( Indapur Bhigavan Market Yard) उपबाजारात ज्वारीच्या ३४ पोती व बाजरीच्या ३६३ पोत्यांची आवक झाली. तसेच मका च्या १४,२५० पोत्यांची आवक झाली. यामध्ये मक्याला व गव्हाला ( maize & wheat) अनुक्रमे २२०० व ३२०० रुपये क्विंटल दर या बाजारात मिळाला. या बाजारात एकूण 17 हजार पिशव्यांची आवक झाली आहे. हे धान्य खरेदी करण्यासाठी कलकत्ता, कर्नाटक, तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यातून मागणी येत आहे.
गुजरात निवडणुकीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता
मागील आठवड्यात 35- 40 रुपये प्रतिकिलो असणारा कंदा सध्या 30-32 रुपयांवर आला आहे. तसेच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाचे दर तेजीत आले असून ४० ते २५१ रुपये प्रतिकिलो दराने डाळिंबाची विक्री होत आहे.
येत्या चार दिवसात जनावरांचे बाजार होणार सुरु! पशुसंवर्धन विभागाने दिली माहिती
यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीला सामोरे जावे लागले. यातून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीच्या विळख्यातून वाचलेले हे पीक आता बाजारात आले असून या पिकाला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
बिर्याणी आणण्यास उशीर झाला म्हणून तरुणांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्याला बेदम मारले; वाचा सविस्तर