Sourav Ganguly । ब्रेकिंग! सौरभ गांगुलीच्या कारचा अपघात, थोडक्यात वाचला माजी क्रिकेटर

Sourav Ganguly

Sourav Ganguly । भारताचे माजी क्रिकेट कर्णधार सौरभ गांगुली यांची कार गुरुवारी दुर्गापूर एक्स्प्रेस वेवर अपघाताची शिकार झाली. सौरभ गांगुली वर्धमान येथील कार्यक्रमासाठी जात होते, तेव्हा अचानक एक लॉरी त्याच्या रेंज रोव्हर कारला धडकली. यामुळे कार चालकाने तातडीने ब्रेक लावून गाडीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र मागून येणारी वाहनं एकमेकांवर आदळली आणि मोठा अपघात झाला.

Manikrao Kokate । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, मंत्रीपदावर संकट

या भीषण अपघातात गांगुलीची कार आणि त्यांच्या ताफ्यातील इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, गांगुली आणि त्याच्या सहकारी अपघातात जखमी झाले नाहीत, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. अपघाताच्या ठिकाणी सौरभ गांगुली काही मिनिटे थांबले होते, त्यानंतर ते कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पुढे निघाले.

GBS । धक्कादायक! अचानक अशक्तपणा, जुलाबाचा त्रास, GBSने आणखी दोन जणांचा मृत्यू

Spread the love