साऊथचा हिरो अल्लू अर्जुनची संपत्ती पाहून डोळे पांढरे होतील

South's hero Allu Arjun's wealth will turn white

नवी दिल्ली | दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी अभिनेता जो बाॅलिवूड स्टार्सला देखील मागे टाकेल. असा प्रतिभावान अभिनेता म्हणजे अल्लू अर्जुन(Allu Arjun). तेलुगू चित्रपटांचा सुपरस्टार मानला जाणारा अल्लू अर्जुन केवळ तिथेच नाही तर हिंदी पट्ट्यातही लोकप्रिय आहे.

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या

याच सुप्रसिद्ध अल्लू अर्जुनची संपत्ती पाहून तुमचे डोळ पांढरे होतील. अल्लू अर्जुन सध्या एका चित्रपटासाठी 125 कोटी रुपये मानधन घेत आहे. अल्लू अर्जुनच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे तर, अभिनेत्याची एकूण संपत्ती (Wealth) 350 कोटी रुपये आहे, जी तो चित्रपट आणि इतर अनेक गोष्टींमधून कमावतो.

धोनीच्या आयुष्यात बायकोच्या आधी खास होती ‘ही’ व्यक्ती; लग्न करणार होता पण…

चित्रपटांसोबतच अल्लू अर्जुन अनेक ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये (Advertisements) काम करतो, ज्यातून तो सुमारे चार कोटी रुपये कमावतो. चित्रपटमध्ये काम करण्यासोबतच अल्लू अर्जुनने हैदराबादमधील आरोग्य सेवेमध्येही गुंतवणूक केली आहे. हैदराबादमध्ये अल्लू अर्जुनचं आलिशान घर आहे. या घराची किंमत 100 कोटींच्या आसपास आहे.

काकांनी दिली नोरा फतेहीला टक्कर; व्हिडीओ पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

घरासोबतच अर्जुनला महागड्या कारचाही (Expensive cars) शौक आहे. अल्लू अर्जुनकडे अनेक वाहने आहेत, ज्यात रेंज रोव्हर वोग, हमर H2, व्होल्वो XC90 T8 एक्सलन्स, मर्सिडीज GLE 350d, Jaguar XJ L आणि BMW X6 M Sport यांचा समावेश आहे. यासोबतच अल्लू अर्जुनकडे पर्सनल व्हॅनिटी व्हॅन ‘द फाल्कन’ आहे, ज्याची किंमत सात कोटी आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *