राज्यात मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याबाबत सुरू असणाऱ्या चर्चा व अफवांना अजित पवार ( Ajit Pawar) यांनी पूर्णविराम दिला आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) सोबत असेल असे म्हणत अजित पवारांनी काल आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना त्यांनी नाव न घेता संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला होता.
सरकार कोसळणार? फडणवीसांच्या ‘त्या’ ट्विटनं उडाली खळबळ
आमच्याबद्दल चुकीच्या बातम्या पेरण्याचे काम काही लोक करत आहेत. माझ्या पक्षातील लोकांना माझ्याबद्दल आकस नाही. मात्र बाहेरील पक्षाचे प्रवक्ते आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत. त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठाऊक ? असे म्हणत अजित पवारांनी नाव न घेता संजय राऊत यांना सुनावले आहे.
राजकीय घडामोडींना वेग! अजित पवार यांनी बोलावली आमदारांची बैठक
दरम्यान यावर संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या चर्चेला मी जबाबदार नाही. माझ्यासाठी फक्त शरद पवारांची भूमिका महत्त्वाची आहे. अजित पवारांवरून भाजप बॅकफूटवर पडले. मी महाविकास आघाडीचा चौकीदार आहे. सेना फुटीनंतर तुम्हीही आम्हाला बोलला होता. राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आम्ही उघडा केला. मग वकिलीच खापर माझ्यावर का फोडत आहात? असे म्हणत संजय राऊत यांनी देखील अजित पवारांना सुनावले आहे.
मोठी बातमी! रुग्णालयामध्ये लागलेल्या भीषण आगीत २१ लोकांचा होरपळून मृत्यू